परुळे शाळेमध्ये जागतिक अंडी दिवस साजरा.

वेंगुर्ला.
जि.प. केंद्र शाळा परुळे नं. 3 तसेच अंगणवाडी परुळे येथे जागतीक अंडी दिवस साजरा करण्यात आला. 13 ऑक्टोबर हा दिवस जागतीक अंडी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचाच एक भाग म्हणुन पशुसंवर्धन विभाग परुळे, जि.प केंद्र शाळा नं. 3 येथे जागतीक अंडी दिनानिमित्ताने मुलांना अंडी वाटप करण्यात आली. याप्रसंगी अंडी आणी आहारातील महत्व पटवुन देण्यात आले.
यावेळी पशुसंवर्धन विभागाचे श्री. सावंत, अजित चव्हाण, मुख्याध्यापक प्रविणा दाभोलकर, शाळाव्यवस्थापन अध्यक्ष सानिका परुळेकर, शिक्षक दत्तात्रय म्हैसकर, तसेच साहील माड्ये आदी उपस्थित होते.