मळेवाड येथे बेकायदेशीर दारू वाहतूक प्रकरणी एकाला अटक. एकुण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.
बेकायदेशीर दारू वाहतूक केल्या प्रकरणी मळेवाड जंक्शन येथे वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सुझुकी बलेनो चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यात गोवा बनावटीचे विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डचे एकुण ४० बॉक्स असा अवैध मद्यसाठा मिळून आला.राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने एकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडुन बलेनोसह दारू असा मिळून सव्वा दहा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी प्रदिप विश्वनाथ निग्रे (रा. खारेपाटण) याला ताब्यात घेण्यात आले आहे.या प्रकरणी निग्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यात २ लाख २४ हजार किंमतीचे मद्य तसेच ८ लाख किंमतीचे चारचाकी वाहन असा एकुण १० लाख २४ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई दुय्यम निरीक्षक तानाजी पाटील, प्रदीप रास्कर, गोपाळ राणे, दिपक वायदंडे,प्रसाद माळी, रणजीत शिंदे यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक टी. बी.पाटील हे करीत आहेत.