शिरोडा वेळागर दुर्घटना.......बेपत्ता चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले

शिरोडा वेळागर दुर्घटना.......बेपत्ता चौघांपैकी दोघांचे मृतदेह सापडले

 

शिरोडा
 

      शिरोडा वेळागर समुद्रात बुडालेल्या लोकांच्या शोध मोहीमेत काल रात्री महत्त्वाची घडामोड घडली. बेपत्ता असलेल्या चौघांपैकी दोन जणांचे मृतदेह शोध पथकाला मिळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पहिला मृतदेह रात्री एक वाजण्याच्या सुमारास सागरतीर्थ समुद्रकिनारी सापडला. तर दुसरा मृतदेह आज बारा वाजण्याच्या सुमारास मोचेमाड किनाऱ्यावर मिळाला. शोधासाठी स्थानिक प्रशासन, तटरक्षक दल, पोलीस व आपत्कालीन यंत्रणांनी संयुक्त मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे, कठीण पोहोच असलेल्या भागांमध्ये शोध घेण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येत आहे. अजूनही दोन लोकांचा शोध सुरू असून, समुद्रातील प्रचंड लाटा व प्रतिकूल हवामानामुळे मोहिमेत अडचणी येत आहेत. मात्र, प्रशासन आणि स्वयंसेवकांचे प्रयत्न अखंड सुरू असून गावकऱ्यांनीही मोठ्या संख्येने मदत केली आहे.या घटनेमुळे संपूर्ण शिरोडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.