वन्यप्राणी यांचा वावर वाढत असल्याने कणकवली वनविभागाच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती.

वन्यप्राणी यांचा वावर वाढत असल्याने कणकवली वनविभागाच्या वतीने लोकांमध्ये जनजागृती.

कणकवली.

    कणकवली वनपरिक्षत्रतील कणकवली,वैभववाडी,देवगड तालुक्यात वन्य प्राणी यांचा वावर वाढत असल्याने लोकांमध्ये जनजागृती व्हावी तसेच लोकांनी सावधानता घ्यावी याचा प्रसार करणेसाठी तिन्ही तालुक्यात विविध प्रकारची माहिती पत्रक वाटून व बॅनर लावून वन विभागाकडून प्रसार करण्यात येत आहे.पाण्याच्या शोधात वन्य प्राणी मानवी वस्तीच्या जवळ येण्याची शक्य असल्यामुळे दिलेल्या सूचनांचे पालन करून  स्वतची काळजी घ्यावी.आणि आगी न लावता वनांचे संरक्षण व वन्यप्राण्यांचे संरक्षण करावे.आणि वनविभागाच्या आधिकरी व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन कणकवली वनक्षेत्रपाल राजेंद्र घुणकीकर यांनी केले आहे.