केळुस ग्रामस्थांचा फिश मिलच्या दूषित सांडपाण्याच्या प्रश्नाबाबत बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा. जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

केळुस ग्रामस्थांचा फिश मिलच्या दूषित सांडपाण्याच्या प्रश्नाबाबत बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा.  जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन.

वेंगुर्ला.

    तालुक्यातील केळुस येथील फिश मिलच्या दूषित सांडपाण्याच्या प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन सादर करून कारवाई न झाल्यास १५ ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनात वेंगुर्ला तालुक्यातील केळूस येथे सन २०१५ च्या दरम्याने आकाश फिश मिल अ‍ॅड फिश ऑईल कं.प्रा.लि.ही कंपनी उभारण्यात आली असून जानेवारी २०१६ पासून कंपनीने प्रत्यक्ष उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.परतुं कंपनी उत्पादन घेत असताना काही बाबीवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असून पंचक्रोशीतील प्रामस्थांच्या जिवीताशी अक्ष्यम खेळ करीत आहे.
    मासळीवर प्रकिया केल्यानंतर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता दुषित सांडपाणी सभोवतालच्या माळरानावर उघड्यावर सोडले जाते.या उघड्यावर सोडलेल्या पाण्यामुळे कंपनीच्या आजबाजूला असलेल्या विहोरींना हे पाणी जावून पिण्याच्या पाण्याच्या विहीरी दुषित होतात.तसेच पावसाळ्यात हेच दुषित सांडपाणी त्याभागात असलेल्या ओढ्याव्दारे खाडीपात्रात सोडले जाते.त्यामुळे या ओढ्यालगत असलेल्या विहीरी वारंवार दुषित होतात. ओढ्याव्दारे सोडलेल्या दुषित सांडपाण्यामुळे खाडीपात्रातील जैवविविधता, मत्स्यसंवर्धन, मत्स्यबीज समूळ नष्ट होवून पर्यावरणास व पर्यटनास धोका निमार्ण झाला आहे. अलिकडच्या काळात कंपनीने सुमारे तीन कि.मी. अंतरावर जमीन जागा घेऊन मोठमोठे खड़े खोदून सांडपाणी सोडले आहे. या सर्वाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळ व प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदुषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करुन सदर कंपनीने त्यांना महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ यांनी घालून दिलेल्या अटी व शर्तीचे उल्लघंन केल्याचे निदर्शनास आणून देवून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. म्हणजेच कंपनी दोषी आहे हे मान्य केले आहे.
    कंपनीकडून मत्स्यप्रक्रिया करीत असताना कोणतीही उपाययोजना नसल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते परिणामी कंपनी सभोवतालच्या परिसरात प्रचंड नागरिकांच्या जीवनमानावर याचा परिणाम होत आहे.
   कंपनीने उत्पादन सुरु करताना सांडपाण्याची योग्य बिल्हेवाट लावण्यासाठी कोणत्याही प्रकारची तजवीज केली नाही.सद्यस्थितीत मासळीवर प्रकिया केलेले दुषित सांडपाणी समुद्रात सोडण्याचा कंपनीचा इरादा आहे. हे दुषित सांडपाणी समुद्रात सोडल्यास याभागातील जैवविविधता, मत्स्यसंवर्धन, मत्स्यबीज नष्ट होऊन पारंपरिक मासेमारीसाठी मासे उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे.परिणामी आम्हां स्थानिक पारंपरिक मच्छीमारांना मासेमारी व्यवसायापासून परावृत्त होवून उपासमारीची वेळ येवू शकते.
    कंपनी पर्यंत येणारा कच्चा माल यादृष्टीने होणारी मासळी वाहतूक करीत असताना याभागातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी पड़ते त्यामुळे वाहनांचे अपघात होतात, याबाबत अनेक तक्रारी यापूर्वीही झालेल्या आहेत.वरील सर्व बाबीच्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालय, केळूस मच्छीमार सहकारी सोसायटी केळूस व ग्रामस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळाकडे व प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून ही योग्यप्रकारे दखल घेतली जात नाही. तसेच आकाश फिशमिल  या कंपनीस महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने दिनांक २२ जुलै २०२४ च्या बजावलेल्या कारणे दाखवा नोटीसीप्रमाणे अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नसलेने आम्ही ग्रामस्थ १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडून न्याय मागणार असल्याचे म्हटले आहे.