उभादांडा न्यू इंग्लिश स्कूल रस्ता प्रश्नासंदर्भात सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व श्री लखमराजे भोसले यांनी दिली भेट. लवकरात लवकर रस्ता उपलब्ध करून देण्याचे दिले आश्वासन.
वेंगुर्ला.
येथील उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला जाणाऱ्या रस्ता प्रश्नासंदर्भात माजी खासदार निलेश राणे यांच्या सूचनेनुसार जमिनीचे मालक सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत श्री.लखमराजे भोसले व सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शाळेच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली व रस्ता लवकरात लवकर उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन सावंतवाडी संस्थानचे युवराज श्रीमंत श्री.लखमराजे भोसले यांनी शाळा संस्था, माजी विद्यार्थी आणि पालकांना दिले.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार मा.श्री. निलेश राणे यांच्या दिनांक ३ ऑगस्टच्या सावंतवाडी भेटी दरम्यान श्री.तुषार साळगांवकर, हितेश धुरी यांनी न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला या विद्यालयाच्या मुलांना जाण्या-येण्यासाठी त्रास होणाऱ्या रस्त्या संदर्भात भेट घेऊन रस्ता प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली होती.त्यानुसार दि.७ ऑगस्ट २०२४ रोजी माजी नगराध्यक्ष संजू परब आणि श्री लखम राजे भोसले (जागा मालक) यांनी न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा या विद्यालयाला प्रत्यक्ष भेट दिली.यावेळी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करून विद्यार्थी आणि शिक्षकांना होणाऱ्या अडीअडचणींची माहिती घेतली.यावेळी जागा मालक श्री लखमराजे भोसले यांनी किमान दहा फूटांचा रस्ता विद्यालयासाठी लवकरात लवकर मोकळा करून देणार अशी ग्वाही दिली.तसेच शाळा संस्था आणि संबंधित कुटुंबीय यांच्या दोन्ही वकिलांकडून माहिती घेऊन, प्रशासकीय अधिकारी म्हणजेच प्रांत यांची लवकरच भेट घेऊन कायदेशीरपणे विद्यालयाला रस्ता उपलब्ध करून देणार असे आश्वासन सुद्धा दिले.तसेच शाळेच्या इमारतीला त्रासदायक ठरणारे झाड ४ दिवसात तोडून देण्याचे सुद्धा आश्वासन दिले.त्याच प्रमाणे विद्यालयच्या रस्त्या संदर्भात जो काही प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी मालक म्हणून आपण पूर्णतः सक्षम असल्यामुळे सदर प्रश्ना साठी आपल्याला कोणत्याही राजकारणी किंवा त्रयस्थ व्यक्तीकडे मध्यस्थी साठी जायची गरज नाही असेही सांगितले.
याप्रसंगी संजू परब तसेच श्री लखमराजे भोसले यांनी शाळा संस्था, माजी विद्यार्थी आणि शाळेतील विद्यार्थी यांना दिलेल्या या पाठिंब्याबद्दल आणि सहकार्याबद्दल समस्त ग्रामस्थाच्या वतीने आभार मानले.
यावेळी उभादांडा सरपंच निलेश चमणकर, अजय गोंधवळे, वसंत तांडेल, रमेश नरसुले, निलेश मांजरेकर, सुजित चमणकर, तुषार साळगावकर, हितेश धुरी, सुनील कांबळी, उदय चिचकर, मंगेश गुरव, सिद्धेश नरसुले, आनंद मेस्त्री, गणेश चेंदवणकर, बाळा परुळेकर, छोटू तांडेल, विनायक रेडकर, नामदेव कुडाळकर, सिल्वेस्टर फर्नांडिस, माडखोल उपसरपंच जी.जी राऊळ तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक, शाळा संस्था पदाधिकारी आणि माजी विद्यार्थी तसेच पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.