युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण येथे रोप वाटप कार्यक्रम संपन्न.

मालवण.
युवासेना प्रमुख व राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज वाढदिवस साजरा होत आहे. राज्याच्या उज्वल भविष्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे राज्याच्या पर्यटन वृद्धिबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी प्रयत्नशील असतात. याच प्रेरणेमधून युवासेना व शिवसेना तालुक्याकडून तालुक्यातील नागरिकांना युवासेनाप्रमुख ठाकरे यांच्या ३४ व्या वाढदिवसानिमित्त काजू व रतांबा झाडांच्या १०३४ रोपांचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना तालुका समन्वयक मंदार ओरसकर, बाबी जोगी, पूनम चव्हाण, राजू परब, उमेश मांजरेकर, अनंत पाटकर, किरण वाळके, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, नाना नाईक, भार्गव खराडे, अक्षय रेवंडकर आदी युवासैनिक, शिवसैनिक व सामान्य नागरिक उपस्थित होते.