कलमठ ग्रामपंचायतीच्या निर्माल्य संकलनाला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद

कलमठ ग्रामपंचायतीच्या निर्माल्य संकलनाला ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद

 

कणकवली
 

  कलमठ ग्रामपंचायतच्यावतीने गणेशोत्सवाच्या काळातील गणेशाचे निर्माल्य घरोघरी संकलन करण्यासाठी निर्माल्य कलश रथ तयार करून घरोघरी जात निर्माल्य संकलन केले गेले.यावेळी भव्य कलश, सजलवेला रथ घेऊन कलमठ गावात फिरवला गेला. कलमठ ग्रामपंचायतच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाला ग्रामस्थांनी अभिमानाने प्रतिसाद दिला. गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांच्या हस्ते या रथाचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण म्हणाले प्लास्टिक नदीमध्ये जाऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार स्तुत्य आहे. कलमठ सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानमध्ये कलमठ ग्रामपंचायत पूर्ण तयारीने सहभागी होणार असून त्याचेच हे पहिले पाऊल आहे. निर्माल्य कलश रथ, स्वच्छ कलमठ संकल्प त्यासाठी कलमठ वासियांनी आमच्या प्रत्येक आवाहनाला नेहमीच चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी सरपंच या नात्याने मी सर्वांचे आभार मानतो.  पहिल्याच दिवशी कलमठ गावातील जवळपास २०० घरातील निर्माल्य संकलन करण्यात आले.
   यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर, सुनील नाडकर्णी, सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, सचिन खोचरे, पपू यादव, माजी सरपंच विनिता बुचडे, प्रसाद घाणेकर, किशोर लाड, आबा कोरगावकर, अनंत हजारे, तेजस लोकरे, मंगेश चिंदरकर, गुरु वर्देकर, जयराम चिंदरकर, प्रथमेश धुमाळे, प्रथमेश मठकर, परेश कांबळी, शाम वर्देकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.