यंदा वेंगुर्लेत रंगणार सिंधुदुर्ग नाट्य महोत्सव....मनीष दळवी यांची माहिती
सावंतवाडी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य केंद्र उभे राहण्यासाठी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला आहे विशेष म्हणजे यावर्षीचा नाट्य महोत्सव वेंगुर्ल्यात घेण्यास त्यांनी हिरवा कंदील दिला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिली सावंतवाडी ही भूमी कला-साहित्याची पंढरी असून शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात या भूमीने महाराष्ट्राचे नाव नेहमीच उज्ज्वल केले आहे. आजच्या डिजिटल युगात पुढच्या पिढीला आपली मूळ संस्कृती आणि मालवणी भाषेचा वारसा समजावून सांगणे हे आपले कर्तव्य आहे. असेही त्यांनी सांगितले. सावंतवाडी नगर परिषदेच्या सहकार्याने ओंकार कला मंच आणि पाटणकर एज्युकेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मालवणी करंडक' एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन श्री दळवी यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी महोत्सव समितीचे स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, मोहिनी मडगावकर, मालवणी करंडक महोत्सव समितीचे अध्यक्ष अमोल टेंबकर उपाध्यक्ष तथा पाटणकर एज्युकेशन ट्रस्टचे संचालक रूजूल पाटणकर, मालवणी कवी दादा मडकईकर, नगरसेवक सुकन्या टोपले नीलम नाईक सुनीता पेडणेकर सिद्धार्थ भांबूरे सतीश पाटणकर सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सचिव संतोष सावंत सावंत तालुका पत्रकार संघाचे सचिव विनायक गावस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी दळवी पुढे म्हणाले मालवणी भाषेतील गोडवा आणि इथल्या नाट्य संस्कृतीचा दर्जा टिकवण्यासाठी 'मालवणी करंडक' सारखे महोत्सव अत्यंत महत्त्वाचे आहेत, जिल्ह्यात एक सुसज्ज 'नाट्य केंद्र' उभारण्यासाठी आपला सातत्याने पाठपुरावा सुरू असून, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यावर्षीचा नाट्य महोत्सव वेंगुर्ल्यात आयोजित करण्यास परवानगी दिली आहे, असे त्यांनी सांगितले. भविष्यात अशा महोत्सवांचे केंद्रबिंदू सावंतवाडीच राहावे, यासाठी आपले प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले. तर मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्य चळवळ जोमाने वाढण्यासाठी नाट्य केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अॅड. रुजूल पाटणकर यांनी प्रास्ताविक करताना नवीन कलाकार घडवण्यासाठी हे व्यासपीठ पुन्हा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. स्वागत समितीचे अध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडीच्या सांस्कृतिक भूमिकेवर प्रकाश टाकला. या सोहळ्याला नगरसेविका दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, आनंद नेवगी, अॅड. सिद्धार्थ भांबुरे, मोहिनी मडगावकर आणि सुधीर आडीवरेकर यांनी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून मालवणी रील स्टार गौरी बांदेकर पद्मा वेंगुर्लेकर, भारती परब, मालवणी कवी रामदास पारकर, जादूगार वैभव कुमार ज्येष्ठ नाट्य कलाकार कल्पना बांदेकर माजी नगरसेवक संजय पेडणेकर आदींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभम धुरी यांनी केले, तर आभार अमोल टेंबकर यांनी मानले. यावेळी सचिव भुवन नाईक, सहसचिव सचिन मोरजकर, खजिनदार श्रेयस मुंज, सदस्य निरंजन सावंत, अनिकेत आसोलकर, आनंद काष्टे, निखिल माळकर, सौ. सावली पाटकर, हेमंत पांगम, साहिल सावंत, भालचंद्र लांबर, मृणाल पावसकर, प्रणव तारी, सिद्धेश नेरुरकर, प्रशांत सावंत, मृणाल चेंडके, हर्ष जाधव, अक्षय माशाळ, सर्वेश मोरजकर आदी उपस्थित होते.

konkansamwad 
