हर्षल राणे व स्वप्निल कोरगावकर राष्ट्रीय स्तरावर करणार दापोली कृषी विद्यापीठाचे नेतृत्व

सिंधुदुर्गनगरी
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस, ओरोसचे विद्यार्थी कु. हर्षल किशोर राणे यांची व्हॉलीबॉल खेळामध्ये व कु. स्वप्नील संतोष कोरगावकर याची बॅडमिंटन या खेळामध्ये अयोध्या येथे होणाऱ्या ICAR (Indian Council of Agricultural Research) च्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. महाविद्यालयाचे दोन्ही खेळाडू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर करणार आहेत.याआधी चंद्रपूर, गडचिरोली येथे झालेल्या क्रीडा महोत्सव अश्वमेध २०२५ स्पर्धेमध्ये दोन्ही खेळाडूंनी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे नेतृत्व केले. महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, क्रीडा प्रमुख लेफ्टनंट विवेक राणे, सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठानचे सचिव शांताराम रावराणे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रदीप सावंत तसेच माजी खासदार तथा संस्थेचे चेअरमन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दोघांचे अभिनंदन केले आहे तसेच हर्षल राणे व स्वप्निल कोरगावकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. कृषी महाविद्यालय किर्लोस तसेच कृषी विद्यापीठ दापोली यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन करुन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.