वेंगुर्ला येथे ‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

वेंगुर्ला येथे ‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम.  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
वेंगुर्ला येथे ‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम.  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.
वेंगुर्ला येथे ‘चक्रीवादळ’ विषयावर रंगीत तालीम.  नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन.

वेंगुर्ला.

   राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार वेंगुर्ला तालुक्‍यातील ग्रमापंचायत उभादांडा मधील नवाबाग, ग्रमापंचायत कार्यालय व मुठ  येथे दिनांक ९ नोव्हेंबर २०२३ रोजी 'चक्रीवादळ' या विषयावर रंगीत तालीमीचे आयोजन करण्यात आले होते.
  यावेळी कार्यक्रमात चक्रीवादळ या आपत्तीच्या अनुषंगाने विविध घटना, प्रसंग उद्भवल्यास त्याला जिल्ह्यातील यंत्रणा कशा रीतीने प्रतिसाद देणार याची माहिती घेण्यात आली.केवळ चक्रीवादळ आल्यास त्या अनुषंगाने प्रशाकीय यंत्रणांच्या तयारीची माहिती घेणे हा याचा मुख्य उद्देश होता.
  यावेळी उभादांडा नवाबाग तसेच ग्रामपंचायत परिसरात ‘चक्रीवादळ’ या आपत्तीच्या अनुषंगाने प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर रंगीत तालीमीचे आयोजन केले होते.यामध्ये चक्रीवादळ’ कालावधीत निर्माण झालेल्या परिस्थितीच्या अनुषंगाने काही शोध व सुटका प्रात्याक्षिके करण्यात आली.तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी नगर परिषद वेंगुर्ला अग्निशमन दलाच्या जवानांकडून नवाबाग येथे तर उभादांडा ग्रामपंचायत येथे एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांकडून प्रात्यक्षिके करून घेण्यात आली.तसेच घरांमध्ये अडकून पडलेल्या व्यक्तीची सूटका कशी करावी याबाबत एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रात्यक्षिक करून दाखवले.या रंगीत तालीम अंती बचाव व सुरक्षा दला मार्फत काही नागरीकांचे स्‍थलांतर खर्डेकर महाविदयालयात करण्यात आले.
   या कार्यक्रमात महसूल, ग्रामविकास, पोलीस यंत्रणा, अग्‍नीशामन दल, महावितरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आरोग्य विभाग, नगर परिषद, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, प्रादेशिक बंदर अधिकारी, मत्स्यव्यवसाय विभाग आदी सहभागी झाले होते.
  यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी, वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ, वेंगुर्ला पोलीस निरीक्षक अतुल जाधव, तसेच सर्व शासकीय विभागाचे अधिकारी कर्मचारी, पोलीस यंत्रणा व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.