श्रावण– शिवभक्ती आणि सणांचा आरंभ

श्रावण महिना म्हणजे भक्ती, निसर्गसौंदर्य, पारंपारिक शिस्त, आणि आंतरिक शुद्धतेचा अविष्कार! प्रत्येक थेंबात शिवाच्या कृपेची अनुभूती, प्रत्येक सणात नात्यांची उब अनुभवता येते. नियम, संयम, उपासना–ही सगळी या मासाच वैभव वाढवतात. "श्रावणात पावसाच्या सरीत डोकावत असलेले शिवभक्ताचे मन शिवाच्या चरणी एकरूप होत, हे या पावन मासाच खूप छान वर्णन आहे." श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील पाचवा महिना आणि वर्षातील सर्वात पवित्र मानला जातो. कारण, हा महिना भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे असे मानले जाते.श्रावणातूनच सण–उत्सवाची सुरुवात होते, श्रावण सोमवारचे उपवास, रुद्रअभिषेक, शंकराची अभिषेक–पूजा, व्रत–वैकल्ये हे सगळे या महिन्यातल्या धार्मिक भावनांना विशेष अर्थ देतात.पौराणिक कथा सांगतात की समुद्रमंथनातून, बाहेर पडलेला ‘हलाहल’ विषयाचा स्वीकार भगवान शंकराने याचवेळी केला होता, त्यामुळे भक्तगण शंकराची विशेष आराधना करतात आणि श्रावणातील सोमवार अत्यंत शुभ मानला जातो. श्रावण महिन्याला ‘सणांचा राजा’ असेही म्हटले जाते.धार्मिक आणि वैज्ञानिक शास्त्रानुसार श्रावण महिन्यात दाढी किंवा केस कापू नयेत, अस म्हटले जाते धार्मिक शास्त्रात यामागे शारीरिक व मानसिक शुद्धता आणि संयमाचे प्रतीक आहे, आणि वैज्ञानिक कारण असे की श्रावण हा पावसाळ्याचा मान्सून काळ असल्याने या काळात हवेत जास्त आर्द्रता, बॅक्टेरिया, फंगल स्पोअर्स, आणि इतर संसर्गकारक घटकांचे प्रमाण वाढते. या महिन्यात केवळ उपासना नव्हे तर पर्यावरण–संवर्धनसुद्धा विविध सणाद्वारे भाविक जपतात. पोळा, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, गणेश चतुर्थी हे उत्सव ही याच काळात येतात. तसेच श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारचा "श्रावणी सोमवार" म्हणून विशेष धार्मिक महत्त्व असते आणि शिवाच्या भक्तीने तो एक विशेष दिवस ठरतो. शिवलिंगावर धान्य अर्पण करणे, उपवास ठेवणे आणि पूजा करणे या काळात प्रचंड धार्मिक कृत्ये केली जातात.
चंद्र शिरोमणी, श्रावणात पाहता..
शिवलिंगावर गिरिजा साद घालता!..
पाण्याच्या थेंबानी शोभतो मुख..
भक्तांसाठी वाढती शुभ्र सुख...
श्रावणाच्या वाफसरंगी पावसात!
शिवाची आराधना मन घालवत चालती...
व्रत, उपवास, भक्तीचे दिन..
आनंद उत्सव, अध्यात्म्याचा किनार...