बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय आयोजित शुटिंग स्पर्धा संपन्न

बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालय आयोजित शुटिंग स्पर्धा संपन्न

 

वेंगुर्ला

 

     बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने मुंबई विद्यापिठ कोकण झोन ४  (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड) शुटिंग स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत एकूण १२ संघानी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा उपरकर शुटिंग रेज कॅम्प मैदान वेंगुर्ला येथे संपन्न झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वेंगुर्ल्याचे माजी नगराध्यक्ष राजन गिरप, बी.के.सी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र खामकर, संस्था प्रतिनिधी सुरेंद्र चव्हाण, मुंबई विद्यापिठाचे राम कदम, राष्ट्रीय पंच कांचन उपरकर, जिमखाना चेअरमन प्रा. डॉ. कमलेश कांबळे, क्रिडा संचालक प्रा. जे. वाय. नाईक, मा. डॉ. सचिन परुळेकर, प्रा.डी.बी राणे, प्रा. बी. एम. भैरट, प्रा.एस. एस. माने, प्रा. राम चव्हाण, प्रा.डॉ बी. जी गायकवाड  उपस्थित होते.
     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनराज गोस्वामी यांच्या हस्ते राजन गिरप यांनी क्रिडा क्षेत्राला दिलेल्या भरीव योगदानाबद्दल शाल व श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच विजयी सर्व खेळाडूंना पदके देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे 

 

मुले 

ओपन साईट

1) प्रतिक बोवलेकर – बी. के. कॉलेज वेंगुर्ला- प्रथम क्रमांक

2) उमाजी कदम - एस. आर. एम. कॉलेज कुडाळ व्दितीय क्रमांक

3) दत्तप्रसाद शेट्ये - कणकवली कॉलेज तृतिय क्रमांक

4) नित्यानंद वेंगुर्लेकर- बी. के. कॉलेज वेंगुर्ला चतुर्थ क्रमांक

पीप साईट

1) समित लाके - यशवंतराव भोसले कॉलेज सावंतवाडी प्रथम क्रमांक

2)विनय सावंत- ए.सी.एस. कॉलेज, ओरोस व्दितीय क्रमांक

3) राहुल पवार - एस. आर. एम. कॉलेज, कुडाळ तृतिय क्रमांक

4) सोहम राणे - कणकवली कॉलेज - चतुर्थ क्रमांक

एअर पिस्तोल

1) साहिश तळणकर - एस.पी. के. कॉलेज, सावंतवाडी प्रथम क्रमांक

2) करण मिलके - आर. पी गोगटे कॉलेज, रत्नागिरी - व्दितीय क्रमांक

3) विनय पालकर - बी.के. कॉलेज वेंगुर्ला तृतिय क्रमांक

4) सुहेश वालावलकर - बी. के. कॉलेज वेंगुर्ला चतुर्थ क्रमांक
 

मुली

ओपन साईट

1) रूपाली करंगुटकर - एस. के. पाटील कॉलेज मालवण - प्रथम क्रमांक

2) निकीता लाड - कणकवली कॉलेज व्दितीय क्रमांक

3) प्राची कांबळी - यशवंतराव भोसले कॉलेज, सावंतवाडी- तृतिय क्रमांक

4) पुर्वा वेंगुर्लेकर - बी. के. कॉलेज वेंगुर्ला- चतुर्थ क्रमांक

पीप साईट

1) साक्षी डांगे - डी. बी. जे कॉलेज, चिपळूण- प्रथम क्रमांक

2) सानिका गावडे - बी. के. कॉलेज वेंगुर्ला व्दितीय क्रमांक

3) सायली वाघाटे - कणकवली कॉलेज तृतिय क्रमांक

4) प्रतिक्षा शिरोडकर - बी. के. कॉलेज वेंगुर्ला चतुर्थ क्रमांक

एअर पिस्तोल

1) वैभवी परब - बी. के. कॉलेज वेंगुर्ला - प्रथम क्रमांक

       वरील खेळाडूंची मुंबई विदयापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे