शिवसेनेकडून निवडणुक प्रभारींची घोषणा

शिवसेनेकडून निवडणुक प्रभारींची घोषणा

मुंबई

 

     आगामी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक प्रभारींची शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली. पक्षाने राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली असून यात शिवसेना मंत्री खासदार यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
     सिंधुदुर्गमध्ये आमदार निलेश राणे व आमदार दीपक केसरकर तर रत्नागिरीमध्ये उद्योगमंत्री उदय सामंत, माजी आमदार सदानंद चव्हाण, मंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
   उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी खास रणनीती तयार केल्याचे या यादीतून दिसून येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज पक्षाकडून निवडणूक प्रभारी जाहीर करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना पक्ष आणि महायुतीला कोणताही धक्का बसू नये, यासाठी अत्यंत काटेकोर नियोजन करत राज्यभरातील ३१ जिल्ह्यांसाठी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रत्येक जिल्ह्यात संघटन मजबूत करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांवर विशेष जबाबदारी देण्यात आली असल्याचे या यादीला पाहता लक्षात येते.
     या प्रभारींना स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांशी समन्वय साधून पक्षाची धोरणे, विकासकामे आणि महायुती सरकारची लोकहिताची कामे आणि योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आज जाहीर झालेल्या निवडणूक प्रभारींमध्ये मंत्री, खासदार, आमदार यांचा समावेश आहे.