कुडाळ येथे २० नोव्हेंबरला भव्य युवासेना मेळावा

कुडाळ येथे २० नोव्हेंबरला भव्य युवासेना मेळावा

 

कुडाळ

 

     सिंधुदुर्ग जिल्ह्याचा भव्य युवासेना मेळावा २० नोव्हेंबर रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या तयारीला वेग आला असून युवासेना कोकण निरीक्षक श्री. राहुल अवघडे यांनी कुडाळ–मालवणचे आमदार माननीय निलेशजी राणे यांची भेट घेऊन त्यांना मेळाव्याचे औपचारिक आमंत्रण दिले.
    या भेटीप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, स्वरूप वाळके, सागर वालावलकर यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. आगामी मेळाव्यासाठी युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून सिंधुदुर्गातील युवा शक्तीची मोठी उपस्थिती अपेक्षित आहे.