परुळे येथे 10 ते 13 जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धांचे आयोजन.

परुळे
परुळे युवक कला क्रीडा मंडळ, परुळे आयोजित स्व. अॅड. अभयकुमार देसाई यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेचे हे 34 वे वर्ष असून चार दिवस एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत.
शुक्रवार दि 10 जानेवारी रोजी सायं 7 वा - शब्दांकुर रंगमंच आरवली - ओळख, रात्री 8 वा मुख्तलीफ थिएटर्स कोल्हापूर निर्झर, रात्री 9 वा उगवाई कलारंग फोंडाघाट कणकवली जापसाल, रात्री 10 वा. श्री समर्थ कलाविष्कार देवगड मशाल, शनिवार दि 11 जानेवारी रोजी सायं 7 वा - ढ मंडळी कुडाळ वाल्मिकी, रात्री 8 वा. नाटकवेडे रत्नागिरी विठाई, रात्री 9 वा निर्मिती थिएटर्स कुडाळ ऑफलाईन, रात्री 10 वा. मॅडबॉक्स थिएटर्स मुंबई मॅ, रात्री 11 वा. अंबरेश्वर थिएटर्स अंबरनाथ चारू, रविवार दि. 12 जानेवारी रोजी सायं. 7 वा. कलासक्त मुंबई पूर्णविराम, रात्री 8 वा. क्रीएटीव्ह कार्टी मुंबई इंटरोगेशन, रात्री 9 वा. थिएटरवाले मुंबई चोली के पीछे क्या है, रात्री 10 वा. दृष्टी पुणे ओळख, रात्री 11 वा. गायन समाज देवल क्लब कोल्हापूर अलमोस्ट डेड, सोमवार दि. 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता राधारंग फाउंडेशन प्रस्तुत भावगीत गायन स्पर्धा, तसेच सायंकाळी 7 वाजता एकांकिका स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ होणार आहे.