कुणकेश्वर शाळेला मिळाला विशेष सन्मान

कुणकेश्वर शाळेला मिळाला विशेष सन्मान


देवगड 
   सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर प्राथमिक शाळा नंबर १ च्या वैदेही वातकर, महिका घाडी आणि रितू सावंत व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका प्रीती नारकर यांचा दिल्लीत गौरव करण्यात आला. त्यांना दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल ताजमध्ये झालेल्या अॅमेझॉन करियर फ्युचर समिट २०२५ या देशपातळीवरील कार्यक्रमात प्रकल्प सादरीकरण करण्याची संधी मिळाली. यात महाराष्ट्रातून सिंधुदुर्ग जिल्हयातील जि. प. शाळा कुणकेश्वर शाळेची निवड करण्यात आली आहे.