वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,तुळस च्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल तुळस मधील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार.

वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग,तुळस च्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल तुळस मधील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार.

वेंगुर्ला.

    रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल तुळस ची विद्यार्थिनी कु.सुरुची संदीप मराठे ही पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यात ४७ वी आली आणि ती महाराष्ट्र शासनाच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरली.तसेच इयत्ता आठवी करिता असलेल्या एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती परीक्षेत कु.दिशा गणपत परब आणि कु.अंकिता सोमनाथ परब या विद्यार्थिनी सारथी शिष्यवृत्ती करिता पात्र ठरल्या.सामाजिक समरसता जपत कार्य करणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस च्यावतीने पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन अभिनंदन आणि सत्कार करण्यात आला. यावेळी तुळस प्रतिष्ठानचे सचिव प्रा.सचिन परुळकर, सर्पमित्र महेश राऊळ, सद्गुरु सावंत मुख्याध्यापक मा.रामकृष्ण देसाई आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. 
   यावेळी प्रा.सचिन परुळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भावी काळामध्ये कु सुरुची मराठे सारखेच यश इतर विद्यार्थ्यांनी सुद्धा मिळवावे अशी अपेक्षा व्यक्त केली तसेच गुणवंत विद्यार्थीनी च्या यशात वाटा असणाऱ्या सर्व शिक्षकांचे आणि मुख्याध्यापक यांचे वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने या सत्काराबद्दल वेताळ प्रतिष्ठानचे हार्दिक आभार मानण्यात आले. सूत्रसंचालन शिक्षक बबन घोडे-पाटील यांनी तर आभार संदीप तुळसकर यांनी मानले.