विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळला; ढिगारा अंगावर पडल्याने २ जणांचा मृत्यू.

मुंबई.
पावसाळ्यापूर्वी म्हाडाकडून दक्षिण मुंबईतील २० अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली असताना आता विक्रोळीत म्हाडाच्या एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.
या घटनेत इमारतीत रहात असलेल्या २ रहिवाशांचा मृत्यू झाला आहे. स्लॅबचा ढिगारा अंगावर कोसळल्याने दोन जण जखमी झाले होते. त्यांच्यावर विक्रोळीतील डाँ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही घटना विक्रोळी पूर्व येथील रमाबाई आंबेडकर उद्यानाजवळच्या म्हाडा इमारतीत घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पूर्व येथील म्हाडाच्या ४० क्रमांक इमारतीमध्ये ही घटना घडली. इमारतीतील एका घराचा स्लॅब कोसळला यात दोन जणांचा मृत्यू झाला.दुर्घटनाग्रस्त इमारत तीन मजल्याची आहे. म्हाडाच्या या इमारतीमधील एका घराच्या छताच्या स्लॅब कोसळला. कोसळलेल्या स्लॅबचा ढिगारा अंगावर पडल्यामुळे दोन जण मुळे दोन जण जखमी झाले होते. त्यांना स्थानिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं.तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.