भाजपा जिल्हा परिषद गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

भाजपा जिल्हा परिषद गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड

सिंधुदुर्गनगरी 

 

     सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी संजय बोबडी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड १६ मार्च रोजी होणार असून, त्यापूर्वी भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर निवडून आलेल्या सर्वच्या सर्व २७ सदस्यांनी एकत्र येत हा अधिकृत गट स्थापन केला आहे.या गटामध्ये प्रमोद रावराणे, श्रावणी रावराणे, रिद्धी सुतार, प्राची इस्वलकर, संतोष पारकर, मनोज रावराणे यांच्यासह भाजपच्या सर्व वरिष्ठ आणि नवनिर्वाचित सदस्यांचा समावेश आहे. गटाच्या स्थापनेनंतर नवनियुक्त गटनेते संजय बोबडी यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेऊन निवडीचे अधिकृत पत्र सादर केले. १६ मार्चला होणाऱ्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीत संजय बोबडी हे सत्ताधारी गटाचे नेतृत्व करणार असून, भाजप जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झाली आहे.