क्रांती दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ला कार्यालयासमोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली.

क्रांती दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ला कार्यालयासमोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली.
क्रांती दिनानिमित्त भाजपा वेंगुर्ला कार्यालयासमोर ध्वजारोहण व हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन श्रद्धांजली.

वेंगुर्ला.

   भाजपाच्या वतीने ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत " हर घर तिरंगा " कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमा अंतर्गत क्रांती दिनाच्या निमीत्ताने भाजपा तालुका कार्यालयाच्या समोर ध्वजारोहण करण्यात आले.
   यावेळी मार्गदर्शन करताना संजु परब म्हणाले कि ९ ऑगस्ट १९४२ रोजी चळवळीस सुरुवात झाल्यानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधींसह मोठ्या नेत्यांना अटक करुन चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला हा ऐतिहासिक दिवस लक्षात ठेवण्यासाठी '९ ऑगस्ट ' हा ऑगस्ट क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो.भारत छोडो आंदोलनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यात झाल्यामुळे याला 'ऑगस्ट चळवळ' किंवा 'ऑगस्ट क्रांती' असेही म्हणतात.भारतातील ब्रिटीशांची सत्ता संपवण्यासाठी ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली होती.
स्वातंत्र्याच्या लढ्यासाठी देशाला आवाहन करण्यासाठी महात्मा गांधी या ऐतिहासिक क्षणांची आठवण करुन देणाऱ्या स्मारकाची उभारणी या मैदानावर केली गेली आहे. भारत छोडो आंदोलनाची सुरुवात गोवालीया टॅक येथून झाल्याने या मैदानाला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे.ध्वजारोहण झाल्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पगुच्छ वाहुन क्रांतीकारकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
    यावेळी जिल्हा उपाध्यक्ष तथा “हर घर तिरंगा” अभियानाचे जिल्हा संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, मा.नगराध्यक्ष राजन गिरप, जि.का.का.सदस्य वसंत तांडेल, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, अल्पसंख्याक सेलचे सायमन आल्मेडा, सुरेंद्र चव्हाण, मच्छिमार सेलचे दादा केळुसकर,  दिपक भगत, किर्तीमंगल भगत, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री व रमेश नार्वेकर, शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे व जगन्नाथ राणे, कार्यालय प्रमुख छोटु कुबल इत्यादी उपस्थित होते.