खर्डेकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

खर्डेकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न.

वेंगुर्ला.

  बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण जिमखाना डे उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अर्चना घारे परब, अध्यक्ष कोकण विभाग राष्ट्रवादी माहिला कॉंग्रेस पार्टी उपस्थित होत्या व्यासपिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले, माजी नगराध्यक्ष नम्रता कृबल स्थानिक सल्लागार समितीचे श्री बाळू खामकर, माजी सभापती जयप्रकश चमणकर विद्यार्थी प्रतिनिधी कु फाल्गुणी नार्वेकर उपस्थित होते.
  कोकणभूमी ही साहित्यकाची व कलावंताची आहे तुम्हाला महाविद्यालयात प्लॅटफॉर्म मिळाला तुम्ही विविध ॲक्टीवीटीज मध्ये भाग घेवून वेगवेगळया क्षेत्रात प्राविण्य मिळविले त्या बदल हयानी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले बॅ.खर्डेकर ही महानव्यक्ती होती खर्डेकर साहेबाच्या नावाप्रमाणे तुम्ही गुणवत्ता व करिअरसाठी धडपडत आहात.तुम्ही भाग्यवान आहात.हा तुमचा सुनेरी काळ आहे तुमच्याजवळ टेलेट आहे. आयुष्याकडे बघताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवा यश मिळेल.यशाच्या मार्ग सुखकर करून महाविद्यालयाचे नाव रोशन करा.असे अर्चना धारे-परब यांनी प्रतिपादन केले.
  आजचा दिवस हा विद्यार्थ्यांचे कौतुक करण्याचा पाठीवर थाप मारून प्रोत्साहित करण्याचा आहे.असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.बी.चौगले यानी मनोगत व्यक्त केले.
    या कार्यक्रमात या वर्षीचा महाविद्यालयचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून कु. गायत्री राजाराम राणे उत्कृष्ट विद्यार्थीनी कू. फाल्गुनी आजित नावेकर सचिव विद्यार्थी मडळ, तसेच मुबई विद्यापीठ हॉलीबॉल खेळाडू ओकार अनंत गोसावी व हर्ज किरण बोवलेकर याना चषक व प्रमाणपत्र, बक्षीस देजून गौरवण्यात आले. नुकत्याच घेण्यात आलेल्या शरीर सौष्ठव स्पर्धेत सिनीअर खर्डेकर  अथर्व मंगेश पालव व ज्युनिअर खर्डेकर पवन बबन कांबळे याचेही प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन कौतुक करण्यात आले तसेच ज्युनिअर महाविद्यालयाची विद्यार्थीनी कु.राजकुमारी हिदुस्थानी सजंयकुमार बगळे होने रायफल शुटींग मध्ये प्राविण्य मिळाल्या बदल सत्कार करण्यात आला.
   महाराष्ट्र स्टुडंटस इनोव्हेशन चॅलेज २०२३ स्पर्धेत सिधुदुर्ग जिल्हयातून दुस-या स्तरावर दहामध्ये निवड झाल्याबदल कु. चैतन्य जितेद्र लाड हीला प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देवून गौरवण्यात आले.
  महाविद्यलयाच्या गेल्या शैक्षणिक वर्गात विशेष प्राविण्य मिळविलेल्या कु.वरस्कर सानिका अमोल, कु शेणई मंगल प्रविण, कु.यादव सारीकाकुमारी सरोज, कु. केरकर भाग्यश्री अविनाश, कु.गावडे गौरी अशोक, कु.याशीरशह मेहबुबशहा मकानदार, कु प्राची प्रसाद मुळीक याना प्रमाणपत्र, बक्षिस व गुलाब पुष्प देवून कौतुक करण्यात आले.
  आजीवन अध्ययन विस्तार विभागाच्या विद्याथ्यांचे उडाण महोत्सवात सहभाग सादर केल्याबदल तसेच हिंदी भाषा प्रचार सभा प्ररिक्षेत विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे पाहुण्याचे हस्ते गुलाब पुष्प देऊन व भारतीय राज्य घटनेची प्रत देवून कौतुक करण्यात आले.
  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसचालन प्रा.सौ.एस. एस दिक्षीत वाषिक पारितोषक वितरण संचलन प्रा. व्ही.एस. चव्हाण, हिंदी भाषा पारितोषिक वितरण प्रा.व्ही.पो. नंदगिरीकर जिमखाना पारितोषिक संचलन क्रिडा संचालक प्रा.जे.वाय नाईक यानीी केले व उपस्थिताचे प्रा.हेमत गावडे यानी आभार मानले.