भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला दिली भेट. येत्या १५ दिवसांत रस्ता प्रश्न मार्गी लावणार असल्याचे दिले आश्वासन.

भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला दिली भेट.  येत्या १५ दिवसांत रस्ता प्रश्न मार्गी लावणार असल्याचे दिले आश्वासन.

वेंगुर्ला.

   उभादांडा न्यू इंग्लिश स्कूलला जाणाऱ्या रस्ता प्रश्नासंदर्भात भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शाळेच्या ठिकाणी जावून प्रत्यक्ष भेट देवून माहिती घेतली व रस्ता प्रश्न येत्या १५ दिवसात मार्गी काढणार असल्याचे सांगितले.यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे या ठिकाणी येतील आणि त्यांच्या माध्यमातून यासंदर्भात निश्चित मार्ग निघेल याची मी ग्वाही देतो.गेल्या अनेक वर्षांचा हा प्रलंबित प्रश्न शंभर टक्के निकाली लावणार आणि त्यानंतरच या ठिकाणी येऊन स्वागत स्वीकारणार असे वचन भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी शाळा, संस्था, माजी विद्यार्थी आणि पालक वर्ग व ग्रामस्थांना दिले.
   येथील न्यू इंग्लिश स्कुल उभादांडा या माध्यमिक शाळेकडे जाणारा रस्ता एका कुटुंबाने पूर्णपणे बंद केल्याच्या निषेधार्थ १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे बेमुदत उपोषणाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या शाळेत जाताना मुलांना चिखलातून, झाडा झुडपातून वाट काढत जावे लागते. याबाबत विशाल परब यांची या शाळेच्या संस्था पदाधिकारी व पालक यांनी भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. यावेळी आज विशाल परब यांनी उभादांडा हायस्कूलला भेट देत वस्तुस्थितीची पाहणी केली तसेच पालक व संस्था चालक यांच्याशी चर्चा केली. यावेळी संस्था सचिव रमेश नरसुले व पालक म्हणून पत्रकार महेंद्र मातोंडकर यांनी याबाबत व्यथा मांडली यावेळी सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत करताना विशाल परब यांनी आपले स्वागत करू नका ज्यावेळी हा प्रश्न मार्गी लागेल स्वागत स्वीकारेन असा शब्द दिला यांनी यावेळी उपस्थित सर्वांना दिला.
   यावेळी ॲड.अनिल निरवडेकर, माजी समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, संस्थेचे अध्यक्ष वीरेंद्र कामत-आडारकर, भाजप तालुका सरचिटणीस बाबली वायंगणकर, युवामोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे यांच्यासाहित उभादांडा ग्रामस्थ, पालक, शिक्षक आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वैभव खानोलकर यांनी केले.