तळवडे श्री सिद्धेश्वर वार्षिक जत्रोत्सव १० नोव्हेंबर रोजी
सावंतवाडी
तळवडे गावचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचा वार्षिक जत्रोत्सव उद्या दि. १० नोव्हेंबरला उत्साहात साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून गाऱ्हाणे घालणे, नवस फेडणे, नवस करणे, ओटी भरणे आदी कार्यक्रम होणार आहे. रात्री १०.३० वाजता पालखी प्रदक्षिणा व दिपोत्सव व त्यानंतर उशिरा नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. तरीही भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळीने केले आहे.

konkansamwad 
