मुंबई - गोवा महामार्गावर जानवली येथे दुचाकीची कारला धडक; दोघे जण जखमी.
कणकवली.
मुंबई गोवा महामार्गावर जानवली येथे दुचाकीची कारला धडक बसली. यात दुचाकी वरील दोघे जखमी झाले आहेत. येथील अनधिकृत मिडलकट ओलांडताना दुपारी साडे बाराच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात दुचाकी वरील एकाचा पाय फॅक्चर झाला असून, त्याला अधिक उपचारासाठी कणकवली दाखल करण्यात आले आहे.
आज दुपारी साडे बाराच्या वाजण्याच्या सुमारास जानवली हॉटेल नीलम कंट्रीसाईड जवळील अनधिकृत मिडलकट ओलांडुन कार गोव्याच्या दिशेने जाणार होती. त्याच वेळी त्या लेन वरून येणारी दुचाकी ला कारची धडक बसली. अपघातानंतर वाहतूक पोलीस राजेश पाटील यांच्यासह नागरिकांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिकेमार्फत जखमी दुचाकी स्वराला तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. जानवली मध्ये एकाच गावामध्ये तब्बल ९ अनधिकृत मिडलकट असून या मिडलकटमुळे अनेकदा अपघात झाले आहेत. मात्र याबाबत कोणत्याही ठोस उपाययोजना होत नसल्याने हे वारंवार मिडलकट अपघातास कारण ठरत आहेत. या मिडलकट मधून कार गोव्याच्या दिशेने वळत होती. मात्र दुचाकी स्वराला दुचाकीवर नियंत्रण ठेवता न आल्याने त्याची कारच्या एका बाजूला जोरदार धडक बसली.