लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर कालावधीत 'दक्षता जनजागृती सप्ताहाचे' आयोजन.
सिंधुदुर्ग.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत "दक्षता जनजागृती सप्ताह-2023" चे आयोजन केले असल्याची माहिती ॲन्टी करप्शन ब्युरोचे पोलीस उपअधीक्षक अरुण पवार यांनी दिली.
" भ्रष्टाचाराला नाही म्हणा, राष्ट्रासाठी वचनबध्द व्हा" लाच देणे व लाच घेणे हे दोन्ही कायद्याने गुन्हा आहे. कोणताही शासकीय अधिकारी अथवा कर्मचारी शासकीय कामासाठी लागणाऱ्या शुल्का व्यतिरिक्त पैशाची, वस्तुची मागणी करीत असले तर ती लाच आहे असे समजावे. जर आपल्याकडे कोणी शासकीय अधिकारी, कर्मचारी अशा प्रकारे लाचेची मागणी करीत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पुढील टोल फ्री क्रमांकावर 1064, व्हॉट्सॲप क्र. 9930997700 वर संपर्क करा किंवा www.acbmaharashtra.gov.in या संकेत स्थळावर तक्रार करा असेही त्यांनी आवाहन केले आहे.