मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींना पाठींबा दिल्यामुळे महायुतीचे युवामताधिक्य वाढणार. मनसे जिल्हासंपर्क प्रमुख संतोष शिंगाडे यांनी व्यक्त केला आत्मविश्वास.

देवगड.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने शिवतीर्थावर झालेल्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या साठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे घोषित केले त्यामुळे सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदार संघातील महायुतीचे जे अधिकृत उमेदवार असतील त्यांच्या मताधिक्यात वाढ होणार असून त्याचप्रमाणे कणकवली, देवगड, वैभववाडी या विधानसभा येथे मताधिक्य सुद्धा वाढणार आहे असा ठाम आत्मविश्वास कणकवली विधानसभा मनसे जिल्हा संपर्कप्रमुख संतोष शिंगाडे यांनी व्यक्त केला आहे.विधानसभा संपर्कप्रमुख या नात्याने संघटना कार्य करीत असताना बहुतांशी गावात मनसेची संघटन बांधणी यापूर्वी झाली तसेच चालूही आहे.राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे याचा थेट फायदा महायुतीच्या उमेदवाराला होणार हे निश्चित आहे.
कणकवली विधानसभा संपर्क प्रमुख म्हणून अनेक गावात मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकारी निर्माण केले विविध समस्या, विषयाची तड लावत तालुक्यात आणि जिल्ह्यात मनसे कार्य सुरू ठेवल्याचे काम केले असल्याने महायुतीला बळ मिळणार आहे.तसेच युवा वर्गाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडत कणकवली विधानसभेमध्ये मनसेचे कार्यकर्ते तयार केले आहेत.शांत संयमी संवेदशील तितक्यात आक्रमक असणारे या कार्यकर्त्यांनी मनसेच्या गाव येथे शाखा काढण्यास सुरुवात केली, खूप गावा मध्ये सोलर दीप , मेडिकल कॅम्प, आरोग्य शिबीर घेतली,कोविड मध्ये खूप लोकांना बेड उपलब्ध करून देणे, मास्क अँड सॅनिटीझर,असे अनेक आरोग्यविषयक वस्तूचे वाटप केले. महिलांसाठी हळदी कुंकू व अन्य असे उपक्रम घेतले देवगड सारखे राजकीय दृष्ट्या संवेदिशीन असणाऱ्या तालुक्यात कोणताही राजकीय वारसा व गॉडफादर नसताना हे गेले ५ ते ६ वर्षे ते या विधानसभेमध्ये सातत्याने काम करत आहेत अशा विविध विषयांच्या माध्यमातून लोकांना न्याय द्यायचे ,मनसेच्या माध्यमातून करत असून त्यांच्या मनसे कडे मोठा युवावर्ग असून याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना होणार हे निश्चित आहे.असेही श्री शिंगाडे यांनी आवर्जून सांगितले.