बावशी येथे 'युगनायकांची जीवनगाथा' ग्रंथाचे कष्टकरी महिलांच्या हस्ते प्रकाशन.

कणकवली.
शिक्षक, कवी व संस्कृती कार्यकर्ते किशोर कदम यांच्या प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या "वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा" या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन मोलमजुरी करणाऱ्या शेतात राबणाऱ्या महिलांच्या हस्ते बावशी येथे प्रकाशन करण्यात आले.या एका अनोख्या प्रकाशन संकल्पनेमुळे श्रमाला प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न आपण केला असल्याचे मत यावेळी कवी कदम यांनी व्यक्त केले.
वक्तृत्व शैलीतील युगनायकांची जीवनगाथा या ग्रंथाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्याची दुसरी आवृत्ती आता प्रसिद्ध करण्यात आली असून त्याचे प्रकाशन कष्टकरी महिला सुवर्णा राणे मनीषा राणे, संगीता कदम, सौ.नार्वेकर, सुनीता कांडर, सुहासिनी कांडर, सौ.मयेकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कवी किशोर कदम, नेहा किशोर कदम, कवी मधुकर मातोंडकर, विनोद ठाकूर, दिनेश पाटील, विलास कांडर, समीर मयेकर, मोहन खडपे, संजय राणे,शिवराम गुरव आदी उपस्थित होते.