विशाल जाधव यांच्या वतीने कोळपे - उंबर्डे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

विशाल जाधव यांच्या वतीने कोळपे - उंबर्डे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

वैभववाडी.

   राष्ट्रीय युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष विशाल जाधव व राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेल जिल्हा उपाध्यक्ष नासीर रमदुक यांच्या माध्यमातून माध्यमिक विद्यालय उंबर्डे, सिताराम विद्यामंदिर शाळा, प्राथमिक उर्दू शाळा मेहबूबनगर, उर्दू हायस्कूल कोळपे - उंबर्डे मेहबूबनगर या शाळांमधील एकूण 433 विद्यार्त्यांना शेक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात आले.
   येत्या काळात गरीब व गरजू मुलांना शेक्षणिक साहित्य, अपंग व्यक्तींना, रक्तदान शिबीर व आरोग्य शिबीरे असे समाजसेवेचे कार्यक्रम जनतेची सेवा करणार असे प्रतिपादन कार्यक्रमा वेळी बोलताना विशाल जाधव यांनी केले.
  यावेळी रसूल मुकादम, श्री राठोड सर मुख्याध्यापक उंबर्डे हायस्कूल, श्रीई पाटील सर, नजरुद्दिन जामदा, श्री कांबळे सर, निजाम बोबडे, यासीन बाबडे, यासुर परखाळी आदी प्रमुख मंडळी व ग्रामस्थ उपस्थित होते.