कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी १ ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन.

कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी १ ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन.

कणकवली.

    कलमठ ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच संदीप मेस्त्री यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्री वयोश्री योजनेकरिता गुरुवार 1 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये गावातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना लाभ दिला जाणार आहे. लाभार्थ्यांनी शिबिरात येताना सोबत आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, रेशन कार्ड झेरॉक्स, पासपोर्ट फोटो घेऊन यायचे आहेत. ग्रामपंचायत कलमठ येथे हे शिबिर घेतले जाणार आहे. तसेच ग्रामपंचायत कलमठ व गद्रे नेत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 30 जुलै रोजी 10 ते दुपारी 2 या वेळेत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोतीबिंदू तपासणी, मशीनद्वारे चष्मा नंबर तपासणी, सवलतीच्या दरात मशीनद्वारे मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सवलतीच्या दरात चष्मे वाटप केले जाणार आहेत. या दोन्ही शिबिरांचे आयोजन ग्रामपंचायत कलमठ या ठिकाणी केले जाणार आहे. या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संदीप मेस्त्री यांनी केले आहे.