लोप पावलेली नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी लवकरच नाट्यमहोत्सवाचे आयोजन: ॲड.सिद्धेश माणगावकर. देवगड युथ फोरम संस्थेचा चौथा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

लोप पावलेली नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी लवकरच नाट्यमहोत्सवाचे आयोजन: ॲड.सिद्धेश माणगावकर.  देवगड युथ फोरम संस्थेचा चौथा वर्धापन दिन सोहळा उत्साहात संपन्न.

देवगड.

   युथ फोरम देवगड संस्थेच्या माध्यमातून देवगड मध्ये काळानुरुप लुप्त झालेली नाट्य कला पुन्हा जिवंत करण्यासाठी लवकरच नाट्य महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे प्रतिपादन देवगड युथ फोरम संस्थेचे अध्यक्ष अँड सिद्धेश माणगावकर यांनी केले.देवगड येथील युथ फोरम या संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिन सोहळा कार्यक्रम देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते व्यासपीठावरून बोलत होते.
    यावेळी युथ फोरम या संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमीत पारकर, खजिनदार सागर गावकर, सहसचिव प्रथमेश माणगांवकर, कार्यकारणी सदस्य ओमकार सारंग, देवगड जामसंडे शहर अध्यक्ष सागर अनभवणे, सोशल मिडीया अध्यक्ष आकाश सकपाळ, चिन्मय बिडये, ॲड.श्रुती माणगांवकर, पुनम नलावडे, उद्योजक अभय कुळकर्णी, दया पाटील,सनित आचरेकर, मृत्युंजय मुणगेकर,परीमल नलावडे, निनाद देशपांडे आदी उपस्थित होते.
   यादरम्यान अँड माणगावकर यांनी युथ फोरमच्या गेल्या चार वर्षातील प्रवासाचे काही किस्से सांगत संस्थेच्या आजपर्यंतच्या जडणघडणीचा प्रवास कथित केला. त्याचप्रमाणे दरवर्षी होणारी राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धा व प्रदर्शन यावर्षी ५ नोव्हेंबर २०२४ रोजी होईल असे जाहिर केले.तसेच जास्तीत जास्त युवकांनी व विद्यार्थ्यांनी युथ फोरम देवगड या संस्थेत सहभागी होऊन पुढील कार्यास हातभार लावण्याचे आवाहन देखील केले.
   यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे यांनी ॲक्टीविस्ट ऑफ द इयर २०२४, जो की दरवर्षी संघटनेत उत्कृष्ट काम करण्याऱ्या व्यक्तीला देऊन त्याचा सन्मान केला जातो,तो अवॉर्ड युथ फोरमचे सागर अनभवणे यांना जाहिर केला. तसेच या कार्यक्रमात युट्युबर आणि रील स्टार लकी कांबळी, बंटी कांबळी, सिध्देश चव्हाण, पराग कुबल आदींचा सन्मान करण्यात आला.त्यासोबत युथ फोरम देवगडचे आकाश सकपाळ व ऋत्विक धुरी यांचा त्यांनी कला सृष्टीत केलेल्या कार्याबद्दल व मिळवलेल्या यशाबद्दल सन्मान करण्यात आला.
    विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून युथ फोरमच्या सर्व सभासदांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अमित पारकर यांनी केले. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋत्विक धुरी यांनी व उपस्थित मान्यवरांचे आभार सागर अनभवणे यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास युथ फोरमचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.