मराठा, कुणबी उमेदवारांनी कौशल्य प्रशिक्षणसाठी लिंकव्दारे नोंदणी करावी. सहायक आयुक्त प्र. ग.प्र. बिटाडे यांचे आवाहन.

सिंधुदुर्ग.
जिल्ह्ययातील मराठा, कुणबी, मराठा–कुणबी व कुणबी- मराठा उमेदवारांनी आवश्यक असलेल्या कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम लिंकव्दारे भरुन नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्र. ग.प्र. बिटाडे यांनी केले आहे.
सारथीच्या लक्षित गटातील उमेदवारांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या संकेतस्थळावर उमेदवारांमार्फत कौशल्य प्रशिक्षण व अभ्यासक्रम मागणी नोंदविण्याकरिता नोंदणी फॉर्म तयार करण्यात आला असून त्याची लिंक पुढीलप्रमाणे आहे. https://Kaushaly.mahaswayam.gov.in/users/sarthi.
या कार्यक्रमांतर्गत सारथीच्या लक्षित गटातील (मराठा,कुणबी, मराठा- कुणबी व कुणबी- मराठा) उमेदवारांना रोजगारक्षम कौशल्य विकास प्रशिक्षण जिल्ह्यातील स्किल इंडिया पोर्टलवरील विविध सेक्टरमधील अभ्यासक्रमाकरिता 5 स्टार, 4 स्टार, 3 स्टार, ट्रेनिंग सेंटर (TP-TC) यांना महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत उद्दीष्ट वाटप करण्यांत येणार आहे.
छत्रपती शाहु महाराज संशोधन प्राशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) अंतर्गत सन 2022-23 या वर्षामध्ये महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मार्फत राज्यातील सारथीच्या लक्षित गटातील 20,000 उमेदवारांकरिता कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगार मिळावा यासाठी सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 02362,228835 किंवा ई-मेल sindhudurgrojgar@gmail.com वर संपर्क साधावा.