महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा. वेंगुर्ला मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांचे आवाहन.

वेंगुर्ला.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यसाठी सर्वेक्षण करण्यात येणार येत आहे.वेंगुर्ला नगरपरिषदेचे कर्मचारी व शिक्षक यांचेमार्फत दि. २३ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार असून या कालावधी दरम्यान नियुक्त केलेले कर्मचारी घरोघरी जाऊन कुटुंबाची माहिती घेणार आहेत.
नियुक्त कर्मचा-यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यात आली आहेत तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. सर्वेक्षणादरम्यान केवळ मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबांची माहिती प्रश्नावलीद्वारे भरुन घेतली जाईल.कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्याची माहिती प्रगणकाला मिळाल्यानंतर त्या कुटुंबाची पुढील माहिती घेतली जाणार नाही.
सर्वेक्षणाचा कालावधी कमी असल्याने प्रगणक सकाळी लवकर अथवा सायंकाळी उशीरा सर्वेक्षणासाठी येऊ शकतात तरी नागरीकांनी आवश्यक माहिती देऊन सर्वेक्षणास सहकार्य करावे असे आवाहन वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.