कुडाळ येथे २९ ऑक्टोंबर रोजी ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन.

कुडाळ.
सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुका व गोवा विभाग यांच्या विद्यमाने ६७ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि संस्थेचे संस्थापक दिवं.वि.तु.जाधव यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ (स्मृती गंध) रविवार दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते सायं.५ वा. मराठा समाज हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी पहिल्या सत्रात- स.१० ते दु. १.३० वा. दिप प्रज्वलन, तथागत गौतम बुध्दांच्या प्रतिमेला पुष्पांजली, बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, त्रिसरण, पंचशील, बुध्द वंदना, पाहुण्यांचे स्वागत, स्वागतगीत, प्रमुख पाहुण्यांची भाषणे, सत्कार. तसेच दुसऱ्या सत्रात - दु. २.३० ते सायं. ५ वा. संस्थापक दिवं. वि.तु.जाधव (बी.ए. ऑनर्स) यांचा जन्मशताब्दी वर्ष सांगता समारंभ (संस्थेच्या मागील ६९ वर्षाचा कार्यअहवाल आणि कार्यकत्यांच्या स्मृतींना उजाळा) 'स्मृती गंध' ( फिल्म डॉक्युमेंटरी). सांस्कृतिक कार्यक्रम बुध्द धम्म, डॉ.बाबासाहेब आंबेडकर गीत गायन अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास सर्व बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामार्ग तालुका व गोवा विभाग यांच्या वतीने करण्यात येत आहे.