मतदानासाठी ७ मे रोजी भर पगारी रजा; जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांचे आदेश.
रत्नागिरी.
लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार दि.7 मे रोजी प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.
या आदेशात म्हटले आहे, रत्नागिरी जिल्हा हा 32 रायगड व 46 रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे व दोन्ही मतदार संघात तिस-या टप्प्यात मंगळवार 7 मे रोजी मतदान होणार आहे. या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना मंगळवार दिनांक 7 मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश पुढील शर्ती/अटीस अधिन राहून देय आहे. 1) सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. 2) ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांचा धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचा-यांसाठी लागू नाही. 3) सदर आदेशाचे पालन न करणा-या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे 135 ब (2) नुसार कारवाईस पात्र राहतील. 4) सदरहू आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणा-या परंतु रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.