‘इग्नाइट महाराष्ट्र २०२४’ अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन.

‘इग्नाइट महाराष्ट्र २०२४’ अंतर्गत कार्यशाळेचे आयोजन.

सिंधुदुर्ग.

    जिल्‍हा उद्योग केंद्र, कार्यालयातर्फे  एमएसएमई क्षेत्रासंबंधात राज्‍य आणि केंद्र सरकारची धोरणे आणि उपक्रम याबाबत जागरुकता वाढविण्‍यासाठी भागधारकांसोबत “IGNITE  MAHARASHTRA- 2024” या अंतर्गत सोमवार दि. 15 जुलै 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 पर्यंत, सिंधुदुर्गनगरी येथील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर सभागृह, पत्रकार भवन येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
   या कार्यशाळेचे अध्यक्षस्थानी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशोर तावडे असणार आहेत. तरी जिल्ह्यातील उद्योजकांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले आहे.