डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड सडा शाळेच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.

डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षेत देवगड सडा शाळेच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.

देवगड.

  जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली.तालुक्यातून सेमी माध्यमातून प्रविष्ट झालेल्या एकूण 16 विद्यार्थ्यापैकी सडा शाळेचे विद्यार्थी जास्त संख्येने सहभागी झाले होते. पहिली ते चौथी पर्यंत सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण देणाऱ्या आदर्श शाळा देवगड सडा शाळेतील विद्यार्थ्यांनी या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.या साठी सर्व स्तरातून शाळेचे कौतुक होत आहे.

उत्तीर्ण विध्यार्थी पुढील प्रमाणे-

 मनाली सुनील कोकरे 202 गुण, आदित्य अनंत सरकटे 194 गुण, वरद पुंडलिक बैलकर 180 गुण, पृथ्वीराज लक्ष्मण नागरगोजे 176 गुण, प्रथमेश झिलू जंगले 168 गुण, लावण्या संदीप मिठबावकर 168 गुण, आराध्या तुकाराम जोशी 142गुण, ईश्वरी स्वप्नील महाडिक 122 गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
  या यशाचे वैशिष्टय म्हणजे सडा शाळेप्रमाणे तालुक्यातील काही शाळातून सेमी माध्यमातून शिक्षण दिले जाते मात्र या परीक्षेला गणित पेपर हा पूर्णपणे इंग्रजी भाषेत असल्याने शाळेच्या यशावर परिणाम होईल यासाठी आणि महत्वाचे म्हणजे  मराठी, सेमी, उर्दू माध्यमाची स्वतंत्र गुणवत्ता यादी लागत नसल्याने सेमी माध्यमाच्या शाळा मराठी माध्यमातून फॉर्म भरताना दिसतात.मात्र सडा शाळेने हे आव्हान स्विकारत यश संपादन केले याबद्दल केंद्र प्रमुख स्नेहा पारकर, वर्ग शिक्षक सचिन ल. जाधव यांनी तसेच सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ, केंद्रबल गटातील शिक्षक या सर्वांनी  शाळेचे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक सर्व शिक्षकांचे व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले आहे.