कणकवली येथे दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात

कणकवली येथे दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात

 

कणकवली

 

        कणकवली तालुक्यातील कनेडी नरडवे मार्गावर काळेथरवाडीनजिक दोन दुचाकी समोरासमोर आदळल्याने अपघात झाला. सदर अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. यामध्ये हिरो कंपनीच्या एचएफ डीलक्स ( एमएच ०७ एयु ४५५९) व टीवीएस कंपनीची एनटॉर्क (एम एच ०७ एयू ६६१८) या दुचाकींच मोठ नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार आनंद घाडी (वय ३४) व चिन्मय शिरसाठ (वय २५ रा. नाटळ) अशी अपघातग्रस्तांची नावे असून आनंद घाडी (वय ३४) यांचा मृत्यू झाला आहे. तर चिन्मय शिरसाठ हे गंभीर जखमी असून प्राथमिक उपचारानंतर त्यांना येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्तांना १०८ नंबर च्या रुग्णवाहिकेने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच आनंद घाडी यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, पंकज पेडणेकर, नवराज झेमने, प्रफुल्ल काणेकर, उत्तम पुजारे आदींनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली होती.