विजयदुर्ग आगारातून नवीन एसटी बसेस सुरू करा. भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख ग्रेसिस फर्नांडिस यांची मागणी.
देवगड.
विजयदुर्ग आगारातून नवीन बसेस सुरू करा अशी मागणी पडेल मंडल विभाग चे भाजपा शक्तिकेंद्र प्रमुख ग्रेसिस फर्नांडिस यांनी केली आहे. विजयदुर्ग आगारातून प्रवाशी उत्पन्न चांगल्या प्रकारे असून लांब पल्ल्याच्या गाड्यांना सुध्दा भारमान असते.नवीन बसेस सुरू कराव्या अशी प्रवाशांची देखील मागणी आहे.तसेच पावसाळी हंगाम असून देखील बस आपल्या मार्गातून चांगली भरमान घेऊन चालते.त्यामुळे महामंडळाचे उत्पन्न देखील वाढेल.अशी विनंती फर्नांडिस यांनी आपल्या पत्रातुन केली आहे.यामध्ये
विजयदुर्ग-पणजी (देवगाड मार्गे) दुपारी 3.15 वा. सुटण्याची वेळ पणजीडून सकाळी 7.00 वा. तरेळे मार्गे, विजयदुर्ग
विजयदुर्ग-सावंतवाडी गाडीला सकाळी 6.45 वा. विजयदुर्ग- बेळगांव विस्तारीत करावी.बेळगांव हुन सकाळी 6.00 वा तरेळे मार्गे,विजयदुर्ग अशी.
मुंबई सेंट्रल हुन संध्याकाळी सुटणारी 5.30 वा. मुंबई-विजयदुर्ग या बस ची वेळ 6.00. वा. वेळ पुर्वीप्रमाणे पुर्वरत करावी. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टाळावी.
मुंबई,बोरीवली, पुणे मार्गावर हिरकणी गाड्या सुरु कराव्यात,
विजयदुर्ग-बोरीवली, रातराणी कायमस्वरूपी करावी. कोकणातील चाकरमानी बोरीवली तसेच नालासोपारा,वसई, मिरारोड या भागात नोकरी निमित्त वास्तव्यास आहेत.अशा त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत.