बकरी ईद दिवशी विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवावा. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनची महावितरणकडे मागणी.

बकरी ईद दिवशी विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवावा.   सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनची महावितरणकडे मागणी.

कुडाळ.

  सिंधुदुर्ग जिल्ह्यात १७ जूनला मुस्लीमधर्मीयांची ईद, "इद-उल-अजहा" साजरी होणारी आहे. त्या दिवशी सोमवार येत आहे आणि सोमवारी विद्युत महावितरण विभागाकडून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत विद्युत पुरवठा खंडित केला जातो. त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर १७ जूनला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात विद्युत पुरवठा अखंडित सुरु ठेवण्यात यावा.अशी मागणी कुडाळ येथील सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने महावितरण कडे करण्यात आली आहे.ईद दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वीज पुरवठा अखंडित सुरू ठेवावा याबाबत महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांना लेखी निवेदन देखील देण्यात आले आहे.
   यावेळी माजी नगरसेवक एजाज नाईक, उद्योजक मुश्ताक शेख, जफर जमादार, सिराजभाई शाह, हाफीज जहेज शेख, साजिद दोस्ती आदी उपस्थित होते.