मालवणच्या बुधवळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

मालवणच्या बुधवळेत विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाकडून सुटका

मालवण


       रविवार 3 मे 2026 रोजी रात्री मालवण तालुक्यातील बुधवळे मळेशेत येथील विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या जलद बचाव पथकाने यशस्वीरीत्या सुटका केली. बिबट सुस्थितीत असल्याने पशुवैद्यकीय तपासणीनंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. स्थानिक ग्रामस्थ श्री. राजू मुणगेकर व श्री. संदीप बुधवळेकर यांनी रात्री बुधवळे मळेशेत येथील विहिरीत बिबट पडल्याची माहिती वनविभागाला दिली. वनविभागाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाचे अधिकारी, जलद बचाव पथक व ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला सुरक्षितरित्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता बिबट पूर्णपणे सुस्थितीत आढळला. त्यानंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. बिबट्याची सुखरूप सुटका झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा," असे आवाहन वनविभागाने केले आहे.  
       हे बचावकार्य उपवनसंरक्षक सावंतवाडी मिलीश दत्त शर्मा व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कुडाळ वनक्षेत्रपाल संदीप कुंभार, वनपाल मालवण सदानंद परब, वनरक्षक धामापूर अतुल खोत, वाहन चालक राहुल मयेकर, RRT टीम सदस्य अनिल गावडे, दिवाकर बांबरर्डेकर, सुशांत करंगुटकर, वैभव अमरुस्कर, प्रसाद गावडे, संदीप परब तसेच स्थानिक ग्रामस्थ राजू मुणगेकर, अनंत शिर्सेकर, संदीप बुधवळेकर, समीर टेंबुलकर, प्रकाश बिडवलेकर, पोलीस पाटील संदीप कुळेकर व बुधवळे ग्रामस्थ यांच्या सहभागातून मोहीम यशस्वी झाली.