आर्टेमिस-2 मोहिमेतील अंतराळवीरांसाठी स्पेस मेनू 189 पदार्थांची मेजवानी; 5 प्रकारचे हॉट सॉस आणि बरंच काही
केनेडी स्पेस सेंटर
'नासा'च्या ऐतिहासिक आर्टेमिस 2 मोहिमेची तयारी अंतिम टप्प्यात असून, 1 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या या प्रक्षेपणासाठी अंतराळवीरांचा स्पेस मेनू जाहीर करण्यात आला आहे. 10 दिवसांच्या या चंद्र मोहिमेत अंतराळवीरांसाठी तब्बल 189 खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे.चंद्राला प्रदक्षिणा घालणाऱ्या रीड वाईजमन, व्हिक्टर ग्लोव्हर, क्रिस्टीना कोच आणि जेरेमी हॅन्सन या चार अंतराळवीरांच्या पथकासाठी 'नासा'ने एक विशेष आहार आराखडा तयार केला आहे. अंतराळात चव आणि पोषण दोन्ही टिकवून ठेवण्यासाठी या मेनूमध्ये वैविध्य आणले गेले आहे. जरी हे अंतराळवीर चंद्रावर उतरणार नसले, तरी 10 दिवसांच्या या प्रवासात त्यांना घरच्या जेवणाची उणीव भासू नये, याची पूर्ण काळजी 'नासा'ने घेतली आहे. पेये (ब्रेव्हेजिस)10 हून अधिक प्रकारची पेये उपलब्ध असतील. यामध्ये ग्रीन टी, कॉफी, मँगो-पीच स्मूदी, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी ब्रेकफास्ट ड्रिंक, लिंबूपाणी आणि कोको य समावेश आहे. प्रत्येक अंतराळवीराला दिवसाला दोन फ्लेवडे पेये मिळतील. क्विच), ब्रेकफास्ट सॉसेज, बदामयुक्त क्युसक्युस, मँगो सॅलड, बारबेक्यूड बीफ ब्रिसकेट, मॅकरोनी आणि चिझ आणि ब्रोकोली ऑ ग्रॅटिन यांसारखे पदार्थ अंतराळवीर खाणार आहेत. वाढवण्यासाठी 5 प्रकारचे हॉट सॉस, स्पायसी मस्टर्ड (मोहरीची चटणी), मेपल सिरप, पीनट बटर आणि चॉकलेट स्प्रेड दिले जाणार आहेत. जेवणानंतर गोड म्हणून पुडिंग, केक, चॉकलेट, कुकीज आणि कँडी-कोटेड बदाम यांचा समावेश आहे. या मोहिमेत जेरेमी हॅन्सन हे कॅनडाचे पहिले अंतराळवीर सहभागी होत आहेत. त्यांच्या आवडीनुसार 'नासा'ने मेनूमध्ये 5 कॅनडियन उत्पादनांचा समावेश केला आहे.ताजे अन्न नाही ओरियन यानमध्ये फ्रीजची सोय नसल्यामुळे, कोणतेही ताजे अन्न नेले जाणार नाही. सर्व पदार्थ दीर्घकाळ टिकणारे आणि खाण्यासाठी सोपे असतील.यानाचे वजन मर्यादित ठेवण्यासाठी पेयांच्या संख्येवर आणि एकूण अन्नावर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. जेवणाची वेळ प्रक्षेपण आणि परतीचा प्रवास वगळता,अंतराळवीरांसाठी दररोज नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण अशी ठराविक वेळ निश्चित करण्यात आली आहे.
konkansamwad 
