डोंबिवली एमआयडीसीमध्ये भीषण स्फोट; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल.

डोंबिवली.
डोंबिवली एमआयडीसीमध्ये मोठा स्फोट झाल्याचे समोर आले आहे. या स्फोटची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. पण बॉयलरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली एमआयडीसी फेज दोनमध्ये हा स्फोट झाल्याचे समजत आहे.आज दुपारी दीड वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला.या स्फोटामुळे आजूबाजुच्या परिसरात मोठा हादरा बसला.या स्फोटात अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.जखमींना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. नेमका स्फोट कशामुळे झाला, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. परंतु, बॉयलरचा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आग इतर कंपन्यांमध्ये पसरली आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, एमआयडीसीच्या बाजुला असलेल्या नागरिकांच्या घराच्या काचा फुटल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या आगीच्या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.