बेकायदा दारू वाहतुकीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; एकूण ८ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त.

सावंतवाडी.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी,संचालक प्रसाद सूर्वे याच्या मार्गदर्शनाखाली इन्सुली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावर वहानानची तपासणी करत असता एम.एच.23 ए.डी.0815 बलेरो गाडी आली असता गाडी थांबवण्याचा इशारा केला.मात्र चालकाने गाडी न थाबवता कुडाळच्या दिशेने भरधाव वेगात निघून गेला.गाडी पळवल्याने संशय आल्याने गाडीचा पाठलाग करून गाडीच्या समोर गाडी थांबवून अडविण्यात आली.गाडीची झडती घेतली असता ड्रायव्हर सिटच्या मागे व हौद्यामध्ये गोवाबनावटीची चोरटी दारू सापडुन आली.चोरट्या दारूची वहातूक करत असल्याने 3 लाख रूपये किमंतीची चोरटी दारू 5 लाख 50 हजार रुपये किमंतीची गाडी मिळून 8 लाख 50 रूपयाच्या मुद्देमालासह रामचंद्र विठ्ठल खाडे वय 45 वर्षे राहाणार घागरवाडा जि.बिड या संशयीताला ताब्यात घेण्यात आले.
सदरची कारवाई निरिक्षक मिलिंद गरूड, दुय्यम निरीक्षक प्रदिप रास्कर, दुय्यम निरीक्षक गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रणजीत राणे, जवान दिपक वायदंडे यांनी केली.अधीक तपास प्रदिप रास्कर करत आहेत.