वर्ल्डकप फायनल जिंकल्यावर विराट कोहलीची टि-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा.

वर्ल्डकप फायनल जिंकल्यावर विराट कोहलीची टि-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा.

बार्बाडोस

   T-20 वर्ल्ड कप फायनल सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका संघावर 7 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने 13 वर्षांनी टी-20 ट्रॉफीवर नाव कोरल.विराट कोहलीने 76 धावांची जिगरबाज खेळी करत टीम इंडियाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचवल.टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 176-7 धावा केल्या होत्या.या धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेच्या संघाला 169-8 धावा करता आल्या. हा सामना संपल्यानंतर विराट कोहलीने टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
   फायनल जिंकल्यानंतर ‘हा माझा शेवटचा टी-20 विश्वचषक होता, पराभव झाला असता तरी मी निवृत्ती जाहीर करणार होतो. पुढच्या पीढीच्या हातात जबाबदारी देण्याची वेळ आली आहे.आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बराच वेळ लागला. कारण रोहितला नऊ वर्ल्ड कप वाट पाहावी लागली, माझा तर हा सहावाच वर्ल्ड कप होता. त्यामुळे या वर्ल्डकपसाठी खऱ्या अर्थाने पात्र होता, अस विराट कोहली म्हणाला.