ठाकरे घराणे हे महाराष्ट्राची अस्मिता : खा. विनायक राऊत. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रचारार्थ सभेदरम्यान पडेल येथे खासदार राऊत यांचे प्रतिपादन.

देवगड.
मुंबईत असलेला मराठी माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्याशी प्रामाणिक पणे उभा आहे. तो मुंबईतून हद्दपार केल्याशिवाय मुंबई गुजरातला जोडण्याचे कपटकारस्थान साध्य होणार नाही यासाठी ठाकरे घराणे संपवायचे आहे. ठाकरे घराणे हे महाराष्ट्राची अस्मिता आहे.
गद्दारांच्या साथीने बाळासाहेबांचा परिवार तोडलात उद्धवजींना एकटे पाडलेत. श्रद्धा होती म्हणूनच आम्ही उद्धव ठाकरे यांचेसोबतच राहिलो. कारण श्रद्धा आणि निष्ठा यांची कदर तुम्ही सर्व कोकणवासीय आहात असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी पडेल येथे महाविकास इंडिया आघाडीच्या जाहीर सभेदरम्यान केले.
महाविकास इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ पडेल कॅन्टीन येते जाहीर प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती या सभेस शिवसेना नेते अरुण दुधवडकर, अतुल रावराणे, सतीश सावंत ,संदेश पारकर, सायली घाडी, गौरीशंकर खोत , प्रदीप नारकर, संदीप घाडी, सुशांत नाईक, युवक काँग्रेसचे किरण टेंबुलकर, आपचे विवेक ताम्हणकर, राष्ट्रीय काँग्रेसचे उमेश कुलकर्णी, सर्व महाविकास, इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
राऊत पुढे म्हणाले की, सध्याची भारतीय जनता पार्टी म्हणजे उन्माद चढलेला पक्ष आहे. गरीब, मुस्लिम, दलित, आदिवासी, यांना संपवायचे व आपल्या मर्जीतील लोक तेवढे ठेवायचे अशी आजची स्थिती आहे. आजची पार्टी म्हणजे बाडग्यांच्या पक्ष झालेला आहे. राणे यांनी राजकारणात किती घरे बदलली स्वतःचा पक्ष जन्माला घालुन ही हातपाय फुटायचे आतच आपणच आपला पक्ष संपविला.
प्रामाणिक पणे काम करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यांना बाजूला फेकले गेले आहेत. मी जिथे जातो तिथे या जनतेच्या माध्यमातून देव आणि देवच मला भेटतात. विनायक राऊत यांनी कोकणभूमी ही खून मारामारी पासून अलिप्त ठेवली आहे. यापूर्वी फक्त राजकीय हत्या होत होत्या. विनायक राऊत खासदार नसून कोकणचा रामभक्त कोकणभूमीचा सेवक आपला बंधूच आहे ही भावना लोकांच्या मनात आता निर्माण झाली आहे. शिंदे सरकारच्या संगमतीने चांगले १६ प्रकल्प गुजरात येथे पळविले. मग रिफायनरी ३ लाख कोटीचा प्रकल्प चांगला असता तर कधीच गुजरातला नेला असता परंतु तो प्रदूषणकारी असल्याने कोकणावर लादला जातोय . दगड फोडायचे कोकणी माणसाने आणि साहेब म्हणून बसवायचे दिल्ली वाल्यांनी हे चुकीचे आहे.भाजपच्या परप्रांतीय मंडळींनी कोकणच्या भूमीवर धाड टाकली असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून व उपस्थित मान्यवरांचे आभार संदीप डोळकर यांनी व्यक्त केले.