पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पहावे : पोलीस निरीक्षक अरुण देवकर. केळकर महाविदयालयात दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न.

पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी म्हणून स्पर्धा परीक्षांकडे पहावे : पोलीस निरीक्षक अरुण देवकर.    केळकर महाविदयालयात दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न.

देवगड.

     समाजाचा आणि देशाचा विकास करायचा असेल तर पदवीप्राप्त विद्यार्थ्यांनी करिअरच्या संधी म्हणून स्पर्धा परिक्षेकडे बघावे. स्पर्धा परिक्षेसाठी खुप मेहनत घेऊन आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त करावे. प्रशासकीय सेवेमधुनच देशसेवा आणि समाजसेवा मोठ्याप्रमाणात घडून येते. त्याचबरोबर मिडीयावर फसवणूकीचे प्रमाण वाढत आहे. फसवणूक कशापध्दतीने होते,यापासून आपण कसे लांब राहीले पाहीजे याविषयी उपस्थितांना देवगड पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी मार्गदर्शन करत स्पर्धा परीक्षांचे महत्त्व पटवून दिले.श्री.सं.ह. केळकर महाविदयालयाच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील पदवी व पदव्युत्तर वि‌द्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देण्याचा दीक्षांत समारंभा प्रसंगी ते बोलत होते.
    या दीक्षांत समारंभास प्रमुख पाहूणे म्हणून पोलीस स्टेशन देवगडचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर आणि शिक्षण विकास मंडळाचे पदाधिकाऱी, नियामक समिती सदस्य आवर्जून उपस्थित होते.
    शिक्षण विकास मंडळ ही आपली मातृसंस्था नेहमीच विद्यार्थी केंद्रीत विचार करीत असून विद्यार्थ्यांचे हित साधण्यात धन्यता मानते. त्यामुळेच चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहावयास मिळते. देवगड महाविद्यालयील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. ही बाब निश्चितच आमच्यासाठी भूषणावह आहे.असे प्रतिपादन विजकुमार कुनुरे यांनी केले.
   दरम्यान शिक्षण विकास मंडळ देवगड चे सदस्य श्री. तुकाराम तेली यांनी करिअर संदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या उज्वल आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पदवीप्राप्त स्नातकांना मुंबई विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
     महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ.सदर दीक्षांत समारंभाचे सूत्रसंचालन अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. प्रल्हाद कांबळे, प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत सिरसाठे, प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा.बाळकृष्ण तेऊरवाडकर, आणि आभार प्रदर्शन प्रा. प्रशांत राऊत सर यानी केले.
   सदर दीक्षांत समारंभास बीए, बी.एस्सी, बीकॉम, एमकॉम, एमएस्सी या शाखेतील पदवीप्राप्त स्नातक मोठ्याप्रमाणात उपस्थित होते. तसेच महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापकांनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेऊन हा दीक्षांत समारंभ यशस्वी केला.