देवरुख येथे आज महायुतीचा मेळावा. पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.

देवरुख येथे आज महायुतीचा मेळावा.   पालकमंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम यांची उपस्थिती.

देवरूख.

  देवरुख येथे संगमेश्वर तालुका महायुतीच्या मेळाव्याचे सोमवार दिनांक २९ रोजी दुपारी ३ वाजता आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा शहरातील माटे भोजने सभागृहात होणार आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ घेण्यात येणार आहे. पालकमंत्री उदय सामंत व  चिपळूण संगमेश्वर मतदार संघाचे आमदार शेखर निकम उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.संगमेश्वर तालुका महायुतीच्या मेळाव्याला महायुती च्या सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रुपेश कदम,  राजेंद्र  पोमेंडकर, प्रमोद  पवार, अनुराग कोचीरकर,  राजेंद्र मोहीते यांनी केले आहे.