वेंगुर्ला येथे ५ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.

वेंगुर्ला येथे ५ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन.

वेंगुर्ला.

  तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसीऐशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ०५ मे, २०२४ रोजी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे सकाळी १०.३० वाजता राष्ट्रीय लोक अदालतीचे अयोजन करण्यांत आले आहे. उच्च न्यायालय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिंधुदुर्ग ओरोस यांनी दिलेल्या निर्देशांस अनुसरुन लोक अदालतीचे आयोजन करण्यांत आले आहे. लोकदालत पक्षकारांच्या हितासाठी आयोजित करण्यात आलेली आहे. त्यातून त्यांना कमीत कमी वेळांत, कमीत कमी खर्चात प्रभावी न्याय मिळू शकतो. ज्या पक्षकारांची प्रलंबित असलेली दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कौटुंबिक वाद, पोटगी आदी प्रकरणे तसेच वीज वितरण कंपनी, दुरसंचार निगम, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत यांनी आपली जास्तीत जास्त प्रकरणे दाखल करुन वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटविण्यांत यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहून खटले मिटवावेत. त्याकरिता संबधितांनी दिवाणी न्यायालय, वेंगुर्ला येथे संपर्क साधावा संपर्कासाठी दुरध्वनी क्रमांक ०२३६६-२६२७०७ हा आहे.
   तसेच ज्या पक्षकारांना आपले प्रकरण चर्चेद्वारे मिटवायाचे असेल अशा पक्षकारांनी वादपूर्व चर्चेसाठी या न्यायालयात हजर रहावे किंवा फोनद्वारे या न्यायालयात संपर्क साधावा. त्यानुसार उभय पक्षकारांना चर्चेची तारीख व माध्यम ठरविण्यात येईल.
   ज्या पक्षकरांचे न्यायालयात प्रलंबित असलेले दिवाणी व फौजदारी खटले किंवा राष्ट्रीय कृत बँका, सहकारी बँका, ग्रामपंचायत कडील वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवायांची आहेत त्यांनी आपली प्रकरणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला या कार्यालयाकडे लवकरात लवकर दाखल करावीत असे आवाहन वेंगुर्ला दिवाणी न्यायाधीश तथा अध्यक्षा, तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला श्रीम.के.के.पाटील व सह दिवाणी न्यायाधीश, वेंगुर्ला श्री.डी.वाय.रायरीकर यांनी केले आहे.