समता पंधरवडा’ निमित्ताने मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता ‘त्रुटी पुर्तता विशेष’ शिबिराचे आयोजन.

सिंधुदुर्ग.
सन 2024-25 या चालू शैक्षणीक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेत प्रवेशित असणाऱ्या व व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (CET) Common Entrance Test, Joint Entrance Examination (JEE) , National Eligibility Cum Entrance Test (NEET) , Graduate Aptitude Test in Engineering (GATE) , National Aptitude Test in Architecture (NATA) तसेच पदविका अभ्यासक्रम पूर्ण करुन पदवी करिता व्यावसायिक अभ्यासक्रम प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षित जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी bartievaldity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर विहीत नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा.
ज्या अर्जदारांनी समितीकडे अर्ज सादर केलेले आहे व ज्यांना त्रुटी बाबत ई-मेलद्वारे किंवा पत्राद्वारे कळविण्यात आलेले आहे. अशा अर्जदारांनी दि. 15 ते 25 एप्रिल 2024 या कालावधीत समिती कार्यालयात सर्व मुळ कागदपत्रांसह / मानीव दिनांकाच्या पुराव्यांसह उपस्थित रहावे. तरी या "त्रुटी पुर्तता विशेष शिबिर" आयोजनाचा लाभ सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, संशोधन अधिकारी सचिन साळे यांनी केले आहे.